काँग्रेसच्या 10 मंत्र्यांची यादी आली समोर; पृथ्वीराज चव्हाणांना...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

 • आज (ता.३०) महाविकासआघाडीच्या सरकारचा होणार विस्तार
 • काँग्रेसचे दहा आमदार शपथ घेण्याची शक्यता
 • राष्ट्रवादीचेही १२-१३ आमदार  घेणार शपथ

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आजचा (सोमवार) मुहूर्त मिळाला असून काँग्रेसचे यामध्ये १० मंत्री शपथ घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेते शपथ घेतील. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत नसल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे निश्चित मानण्यात येत आहे.

No photo description available.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दहा आमदार शपथ घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेसच्या मंत्र्याची नावे फिक्स झाली असून ती यादी मुख्यमंत्र्याकडे गेली असल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचेही १२-१३ आमदार आज (ता. ३०) शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

हे काँग्रेस आमदार आज शपथ घेणार

 • के.सी.पाडवी (कॅबिनेट)
 • अशोक चव्हाण (कॅबिनेट)
 • अमित देशमुख (कॅबिनेट)
 • यशोमती ठाकूर (कॅबिनेट)
 • विजय वड्डेटीवार (कॅबिनेट) 
 • सुनील केदार (कॅबिनेट)
 • अस्लम शेख (कॅबिनेट)
 • वर्षा गायकवाड (कॅबिनेट)
 • सतेज पाटील (राज्यमंत्री)
 • विश्वजित कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

दरम्यान, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भव्य शपथविधी सोहळा होणार सोमवारी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तरासाठी विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधीला साधारण 6000 लोकांच्या आसनांची तयारी करण्यात येत आहे, त्यासाठी मंडप तयार करण्यात येत आहे. प्रांगणात 15 एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress fix list of MLA for Taking oath as minister