Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांविरोधात देशमुख लढणार

टीम ई-सकाळ
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चौथी यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 19 उमेदवारांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चौथी यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 19 उमेदवारांचा समावेश आहे.

यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुख निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात त्यांचा थेट सामना होणार आहे.

तसेच गोंदिया मतदारसंघातून अमर वरदे, घाटकोपर पश्चिममधून आनंद शुक्ला, वर्सोवा मतदारसंघातून बलदेव बसंतसिंग खोसा, कणकवलीतून सुशील अमृतराव राणे तर हातकणंगलेतून राजू जयवंतराव आवळे यांच्यासह 19 जणांना उमेदवारी देण्यात आली. 

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Fourth Candidates List Declared for Maharashtra Vidhan Sabha 2019