नोटाबंदीविरोधात कॉंग्रेसचा हल्लाबोल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज कॉंग्रेसने आरबीआयच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कॉंग्रेसच्या या आंदोलन कर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरच रोखले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते रणदिपसिंग सुरजेवाला, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक बडे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी या नेत्यांना अटक करून तात्काळ सोडून दिले. राजकीय पक्षांनी भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढण्याची बॅंकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असावी. 

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी भारतीय जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्याची विश्‍वसनीय संस्था असलेली भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता संपुष्टात आणल्याची टीका केली. देशाच्या जनतेची ही बॅंक सध्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा बनली असल्याचा आरोप केला. ऊर्जित पटेल यांना या बॅंकेच्या गव्हर्नरपदी राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही कॉंग्रेसने केली. 

नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयाने देशाची प्रगती थांबली आहे. 50 लाखांहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वयंघोषित निर्णयाने देशात आर्थिक अराजकता आल्याचाही आरोप सुरजेवाला यांनी केला. 

रांगेत उभे असताना देशभरात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागून आर्थिक मोबदला देण्याची मागणीही या निवेदनात कॉंग्रेसने केली आहे. 

या निर्णयामुळे देशाच्या सकल उत्पन्नात मोठी घसरण सुरू झालेली असून, तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा त्यांनी केला. 

श्‍वेतपत्रिका काढा 
नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला याचा हिशेब आरबीआयने देशाच्या जनतेला द्यावा. याशिवाय, महाराष्ट्रात पंकजा मुंडे, सुभाष देशमुख या भाजप मंत्र्यांच्या बॅंकांशी संबंधित असलेला कोट्यवधी रुपयांच्या नोटा सापडल्याने त्यावर सरकारने काय कारवाई केली हे जाहीर करावे. नोटाबंदीच्या अगोदर व नोटबंदी नंतर गुजरातच्या बॅंकेत जमा झालेले हजारो कोटी रुपये कोणाचे हे जाहीर करून या संपूर्ण निर्णयाचे परिणाम विषद करणारी श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणीही कॉंग्रेसने या वेळी केली.

Web Title: Congress hallabola against notabandi