'चंद्रकांतदादा, सावरकर आणि हेडगेवार ही नावे तुम्हाला लखलाभ'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पाटील साहेब, उगाच शिवाजी महाराज आणि टिळकांच्या नावाशी भाजपाचे नाव जोडू नका! शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजा होते आणि टिळक ब्रिटिशांविरुद्ध लढले! हेडगेवार आणि सावरकर ही नावे तुम्हाला लखलाभ असो! अशी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

मुंबई : पाटील साहेब, उगाच शिवाजी महाराज आणि टिळकांच्या नावाशी भाजपाचे नाव जोडू नका! शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजा होते आणि टिळक ब्रिटिशांविरुद्ध लढले! हेडगेवार आणि सावरकर ही नावे तुम्हाला लखलाभ असो! अशी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
 

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना काँग्रेस हा पक्ष नसून संस्कृती आहे. काँग्रेस म्हणजे जातीयता, काँग्रेस म्हणजे घराणेशाही, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार. म्हणून, भविष्यात काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे आपले धोरण आहे. ही संस्कृती बदलून आपली संस्कृती आणणे हे आपले पुढील पाच वर्षातील धोरण आहे. आपली परंपरा शिवाजी महाराज, टिळक, हेडगेवार आणि सावरकरांची आहे. ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे म्हटले होते. त्याला सचिन सावंत यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leadar Sachin Sawant Criticses On Chandrakant Patil