फेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

सर्जिकल स्ट्राईक करुन फेकून द्यायला हवे

शिवसेना म्हणते गाडून टाकू. भाजपवाले बोलतात 'पटग देंगे'. आता जनतेने यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करून यांना फेकून दिले पाहिजे.

नागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे'', अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.  

नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. सरकारचे वाभाडे काढले पाहिजे. 5 वर्षांत भाजपने प्रत्यक्षात काही केलं नाही. मात्र, या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस महात्मा गांधींची जयंती साजरी करू लागले आहेत. 'हवा का झोका कभी अंधी नहीं हो सकता !
चरखा चलाके कोई महात्मा गांधी नहीं हो सकता !

तसेच ते पुढे म्हणाले, 3 राज्यांतील सत्ता गेल्यावर 'उखाड देंगे फेंक देंगे'ची भाषा भाजपने सुरू केली. आम्ही 40 वर्षे सत्तेवर होतो. मात्र, अशी भाषा कधी वापरली नाही. वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, पुतळ्याचे उद्गाटन करण्याची त्यांची तेवढी पात्रता नाही. याशिवाय भाजपवाल्यांना वाटत असेल, आम्ही कायम पंतप्रधानपदावर राहू. ही लोकशाहीची विटंबना आहे.

सर्जिकल स्ट्राईक करुन फेकून द्यायला हवे

शिवसेना म्हणते गाडून टाकू. भाजपवाले बोलतात 'पटग देंगे'. आता जनतेने यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करून यांना फेकून दिले पाहिजे.

जुमला नंबर 2 सुरु

आता जुमला सिरिज नंबर 2 सुरू झाला आहे. येत्या 60 दिवसांत नुसता घोषणांचा पाऊस पडणार आहे.

Web Title: Congress Leader Ashok Chavan Criticizes Fadnavis Government