युतीची परिस्थिती आपण दोघे भाऊ-भाऊ, दोघे मिळून खाऊ : अशोक चव्हाण

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून खाऊ अशी परिस्थिती सध्या युतीमध्ये निर्माण झाली आहे.

- अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

नांदेड : आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून खाऊ अशी परिस्थिती सध्या युतीमध्ये निर्माण झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी युती सरकारवर निशाणा साधला. तसेच शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, असेही ते म्हणाले.

नांदेड येथे आयोजित महाआघाडीच्या पहिल्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होेते. ते म्हणाले, मुंबईसारख्या शहरात जीवंत बॉम्ब आणि हे बॉम्ब तयार करणारे सापडतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अन् शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार चिरडत आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाते. तसेच ते पुढे म्हणाले, 'टायगर' लाचार आहे, अशी परिस्थिती सध्या शिवसेनेची झाली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे

Web Title: Congress Leader Ashok Chavan Criticizes on Shivsena BJP Alliance