Balasaheb Thorat : 'मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं?’ काय म्हणाले बाळासाहेब थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat : 'मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं?’ काय म्हणाले बाळासाहेब थोरात

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातीन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने या नाट्यमय घडामोडी पुढे आल्या होत्या. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

तर विरोधीपक्ष नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला राजीनामा दिल्याचे सांगितल्याचे म्हंटले होते. या सर्व घडामोडी घडल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच यावर भाष्य केलं असून मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं? असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांना विचारला आहे.

काँग्रेसच्या जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी थोरात गेले आहेत. तेथे महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा प्रश्न विचारला आहे. पक्षात यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर थोरात आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभेद निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीनंतर थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. पत्र लिहलं आणि आपला विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या.