मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी; भाईंचे निरुपमांना प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षसंघटनेत केंद्रीय पातळीवर मोठे पद दिले जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर ट्वीट करुन निरूपम यांनी देवरा यांच्यावर टीका केली होती. 'राजीनामा देण्यामागची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे तर राष्ट्रीय पातळीवरचे पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? पक्षाने अशा 'कर्मठ' लोकांपासून सावध राहिले पाहिजे.' असे निरुपम यांनी म्हटले होते. 

मुंबई : मिलिंद देवरा यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळीने पुन्हा तोंड काढले आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षसंघटनेत केंद्रीय पातळीवर मोठे पद दिले जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर ट्वीट करुन निरूपम यांनी देवरा यांच्यावर टीका केली होती. 'राजीनामा देण्यामागची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे तर राष्ट्रीय पातळीवरचे पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? पक्षाने अशा 'कर्मठ' लोकांपासून सावध राहिले पाहिजे.' असे निरुपम यांनी म्हटले होते. 

त्याला भाई जगताप यांनी ट्वीट करुन प्रत्युत्तर दिले आहे. 'काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूकही लढवतात. इतके करुनही ते २.७ लाखांच्या मतांनी निवडणूकीत पराभूत होतात. अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे,' असा टोला भाई जगताप यांनी संजय निरूपम यांना उद्देशून लगावला आहे. कामगार जगतावर पकड असलेले भाई जगताप मुंबईत काँग्रेसमधला मराठी आवाज मानले जातात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Bhai Jagtap answer to Sanjay Nirupam