काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्याही हाती कमळ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये होणारे इन्कमिंग जोरात सुरू असतानाच आता काँग्रेसमधील बडे नेते हर्षवर्धन पाटील पुढच्या आठवड्यात भाजपचे कमळ हातात घेणार आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये होणारे इन्कमिंग जोरात सुरू असतानाच आता काँग्रेसमधील बडे नेते हर्षवर्धन पाटील पुढच्या आठवड्यात भाजपचे कमळ हातात घेणार आहेत.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीत लोकसभेच्या निवडणुकीत मदत केल्यानंतरही न मिळालेले उमेदवारीचे आश्वासन, मतदारसंघाच्या दौऱ्यात नागरिकांनी दिलेला कौल तसेच चंद्रकांतदादांशी झालेली चर्चा यामुळे हर्षवर्धन यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचे समजते. मतदारसंघात कार्यकर्ते भाजपकडे जा असा आग्रह धरत आहेत. काँग्रेस पक्षाला भवितव्य नाही अन् जागाही सोडली जाईल काय याची खात्री नसल्याने हे ठरवण्यात आले आहे, असे समजते.

काही दिवसांपूर्वीच हा निर्णय झाल्याचेही सांगण्यात येते. पुढच्या आठवड्यात काँग्रेसला धक्का बसणार असे सांगितले जाते आहे. त्याचा शोध घेता ही माहिती हाती लागली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क होवू शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Harshvardhan Patil may Joins BJP Party