...तर बुलेट ट्रेनचे तिकीट 13 हजार : पृथ्वीराज चव्हाण 

बुधवार, 11 जुलै 2018

तिसऱ्या आघाडीविषयी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, तिसरी आघाडी हे भाजपने सोडलेलं पिल्लू आहे. तर आघाडीचे ठरले तर त्याचे नेतृत्व सोनिया गांधी करतील, असेही चव्हाण म्हणाले.

नागपूर : गरज नसताना बुलेट ट्रेनचा सरकारचा हट्ट अनाकलनिय आहे. यामागे जपानचाच फायदा अधिक असून, सरकारी अनुदान दिले नाही तर सामान्य नागरिकांना मुंबई अमदाबाद प्रवासासाठी 13 ते 14 हजार रूपये तिकीट दर द्यावा लागेल. अशी धक्कादायक माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. 'सुयोग' या पत्रकारांच्या निवासस्थानी ते बोलत होते. 

यावेळी बुलेट ट्रेन विषयी प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बुलेट ट्रेनने मुंबईहुन अहमदाबादला जाण्यासाठी 3 तास लागणार आहेत. विमानाने जाण्यासाठी या मार्गावर दीड ते अडीच हजार रुपये लागतात. आणि वेळही कमी लागतो. मात्र 3 तास वेळ जाऊन जर सबसिडी दिली नाही तर या बुलेट ट्रेनचे तिकीट 13 ते 14 हजार रुपये राहील, असे चव्हाण म्हणाले. 

तिसऱ्या आघाडीविषयी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, तिसरी आघाडी हे भाजपने सोडलेलं पिल्लू आहे. तर आघाडीचे ठरले तर त्याचे नेतृत्व सोनिया गांधी करतील, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Congress leader Prithviraj Chavan talked about Bullet Train fare