विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता ते कॅबिनेट मंत्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी हे त्यांचे मूळ गाव. 1980 ते 1981 पर्यंत एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. एनएसयुआयच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 

चंद्रपूर : विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक आहे. काही काळासाठी वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख देखील होते. त्यांनी चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्याच्या कॉंग्रेसच्या राजकारणावर पकड प्राप्त केली आहे. नारायण राणे यांच्या सोबत त्यांनी कॉंग्रेसप्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात स्वतःचा गट तयार केला. नंतरच्या काळात कॉंग्रेसचे विदर्भस्तरीय नेतृत्व रूपात स्वतःला स्थापित केले. आता त्यांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. 

क्लिक करा - गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोच असणारा दबंग नेता... सुनील केदार

2014 ते 19 या काळात भाजप विरोधात विदर्भातील बुलंद आवाज म्हणून विजय वडेट्टीवार यांची ख्याती झाली. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी विदर्भातील तिकीट वाटपात मोलाची भूमिका बजावली होती. विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी हे त्यांचे मूळ गाव. 1980 ते 1981 पर्यंत एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. एनएसयुआयच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Image may contain: 4 people, people standing and flower

 

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवित युवकांचे संघटन उभे केले. 1991 ते 1993 या कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामनियुक्त सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर 1996 मध्ये महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवित कार्याची पावती देण्यात आली. 1998 मध्ये चिमूर विधानसभेतून ते पहिल्यांदा विधानसभेत गेले. विजय वडेट्टीवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1962 मध्ये करंजी (ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) येथे झाला. त्यांनी एच.एस.सी पर्यंत शिक्षण घेतले आहे. 

अधिक वाचा - युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारे महाराष्ट्र भूषण अनिलबाबू... असा आहे राजकीय प्रवास

मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष

आघाडी सरकारच्या काळात 2008 मध्ये ते जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण व वने राज्यमंत्री होते. 2010 मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभेतून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. 2014 मध्ये त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यानंतर कॉंग्रेसने प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing and wedding

विधानसभेचे विरोधी पक्षनेते

2015 मध्ये विधानसभेचे उपनेता म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. जून 2019 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर 2019 झालेल्या निवडणुकीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विद्यार्थी नेता ते कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास वडेट्टीवारांचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader vijay vadetivar sworn in as cabinet minister of maharashtra