भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदमांचा मोठा खुलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला लगावला होता. यालाच विश्वजीत कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी असे हास्यास्पद वक्तव्य का करावे? असेही कदम यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : पतंगराव कदम साहेबांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काढली. यापुढेही मी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन महाराष्ट्रात काम करणार असून याबद्दल कोणाला शंका असण्याचे कारण नाही. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला लगावला होता. यालाच विश्वजीत कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी असे हास्यास्पद वक्तव्य का करावे? असेही कदम यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये सहभागी झाल्यास आश्चर्य वाटालयला नको, असे विधान केले होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Vishwajeet Kadam talks about Chandrakant Patil claim