मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नात काँग्रेस नेते दंग - विखे 

मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नात काँग्रेस नेते दंग - विखे 

शिर्डी - काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी काँग्रेस नेत्यांवर प्रहार केला. 

विखे यांनी आज साईसमाधीचे दर्शन घेतले. या वेळी ‘जनतेच्या भावनेचा आदर करून आपण यापुढील निर्णय घेऊ,’ असे सूचक विधान करून विखे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे सूतोवाच आज केले. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, ‘पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री होतील,’ असे विधान केले होते. त्याला दुजोरा देणारे विधान विखे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com