Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या पहिल्या 50 उमेदवारांची नावे निश्चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, काँग्रेसने पहिल्या 50 नावांची यादी निश्चित केली आहे. पहिल्या 50 उमेदवारांची यादी काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, काँग्रेसने पहिल्या 50 नावांची यादी निश्चित केली आहे. पहिल्या 50 उमेदवारांची यादी काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना आज (ता. 18) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापाठोपाठ काँग्रेसकडूनही 50 नावांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली असून दोन्ही पक्ष 125-125 जागांवर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित 38 जागा या मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress may announces first list of candidate on 20 September