गटनेता ठरवण्यासाठी कॉंग्रेसची सोमवारी बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मे 2019

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वीरेंद्र जगताप अशी नावे या पदासाठी चर्चेत आहेत. 23 तारखेच्या निकालांमुळे नेत्याच्या निवडीवर परिणाम होऊ नये यासाठी हा दिवस निवडण्यात आल्याची चर्चा आहे. ज्या कॉंग्रेस आमदारांनी पक्षाविरोधात काम केले त्यांच्याविषयीचा अहवाल त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांनी द्यावा असे सांगण्यात आले आहे. हे अहवाल अद्याप मिळायचे आहेत पण त्यानुसारच कारवाई करण्यात येईल असे आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत विखे, नीलेश राणे, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांना निलंबित केले, तर कॉंग्रेसचे संख्याबळ कमी होईल, त्यामुळे सध्याच कोणतीही कारवाई न होण्याची शक्‍यता अधिक आहे.
Web Title: Congress Meeting for Group Leader Politics