कांँग्रेसचेही आमदार येणार; संख्याबळ ५० च्या वर, बच्चू कडूंचा दावा

बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे आहेत.
Bacchu Kadu News
Bacchu Kadu Newsgoogle

Bacchu Kadu News: शिवसेनेच मंत्री आणि गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनीच बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणातही चर्चेला उधाण आले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 33 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे 2 आमदार (Prahar Sanghtna 2 MLA) असल्यामुळे आता 35 आमदार आपल्यासोबत असल्याचे शिंदेंनी खुलासा केला. दरम्यान, काँग्रेसचे आमदारही सोबत येणार असल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.

Bacchu Kadu News
एकनाथ शिंदे : मुंबई नव्हे तर ठाण्यातील या बंगल्यावर शिजली बंडाळी

बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे आहेत. यावेळा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८ -३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार. दोन तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. असा दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला.

Bacchu Kadu News
शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास

बच्चू कडूंनी सांगितलं नाराजीचं कारण

शिंदेसोबत असलेले सर्व आमदार खुश आहेत. आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार इथं आल्याने आम्हीही इथं आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. असे कारण बच्चू कडू यांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मत दिलंय, मग हे अचानक वातावरण तयार झालं आणि परिस्थिती बदलली. असा खुलासा बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com