काँग्रेसच्या आमदारांना भोपाळला नेले जाणार?

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या घरातून आमदार भोपाळला जाण्यासाठी रवाना होणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांचे सरकार कितीपत स्थिर राहील हा चर्चेचा मुद्दा असतानाच काँग्रेसने आपल्या आमदारांना भोपाळला नेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले. मात्र, आता अजित पवारांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाठिंबा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पुढील राजकीय दगाफटका पाहता काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्वच आमदारांना आता भोपाळमध्ये हलविण्यात येणार आहे. काँग्रेस आमदार भोपाळला जाण्याच्या तयारीतही आहेत. 

अमृता फडणवीस म्हणतात, फडणवीस-अजित पवारांनी करून दाखवलं!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या घरातून आमदार भोपाळला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. आमदारांच्या फोडाफोडीची भीती, संभाव्य घोडेबाजार या सर्व बाबींची शक्यता लक्षात घेता काँग्रेसनेही राजकीय रणनीती आखली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA may go today in Bhopal