विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

फोडाफोडीचे जनक कोण सर्वांनाच माहिती : मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान वडेट्टीवार यांना तरी आमच्याकडे ठेवा, अशी मिश्कील टीप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. 

मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज (सोमवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

वडेट्टीवर यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवत त्यांचे अभिनंदन केले. आगोदरचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी जागेवर जाऊन त्यांचे अभिनंदन केले. विधान परिषदेत सभापती, उपसभापतिपदाचा निवडणूक होत असून, येथेही शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांची निवड बिनविरोध होत आहे. 

वडेट्टीवार यांच्या नियुक्‍तीची घोषणा करावी, असा आग्रह काँग्रेसने अधिवेशन सुरु होताच धरला होता. केंद्रात ज्याप्रमाणे विरोधी पक्षाला नेतेपद दिले नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हे पद रिक्‍त ठेवले जाणार काय, या भीतीने ग्रासलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजप व शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली होती. वडेट्टीवारांच्या विरोधी पक्षनेतेपदाला तीन महिन्यांचाच अवधी असेल.

फोडाफोडीचे जनक कोण सर्वांनाच माहिती : मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान वडेट्टीवार यांना तरी आमच्याकडे ठेवा, अशी मिश्कील टीप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Vijay Wadettiwar new opposition leader in Maharashtra assembly