कॉंग्रेस आमदार देणार एक महिन्याचे वेतन - राधाकृष्ण विखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

शिर्डी - ""केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,'' अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""दिल्ली येथील बैठकीत राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय राज्यातील अन्य संस्था व उद्योजकांकडून मदत गोळा करून ती केरळला पाठविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या राज्यावर "न भूतो; न भविष्यती' असे संकट कोसळले आहे. तीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही राष्ट्रीय आपत्ती असून, जनतेने मदतीसाठी पुढे यावे.''

Web Title: Congress MLAs will give one month's salary says Radhakrishna Vikhe Patil