‘राष्ट्रवादी’ विरोधात पटोलेंचे गाऱ्हाणे

आघाडीत धुसफूस : सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला अपमानाचा पाढा
congress nana patole sonia gandhi ramdas athwale nagpur
congress nana patole sonia gandhi ramdas athwale nagpur sakal

नागपूर : गोंदिया-भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची तक्रार थेट सोनिया गांधी यांच्याकडे केली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर पटोले यांनी ‘राष्ट्रवादी’ने पाठीत खंजीर खुपसला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ती राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांची राजकीय पार्श्वभूमीचा मुद्दा पुढे आणीत केवळ ‘हेडलाईन’साठी पटोले असे वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावर पटोले यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देऊन पवार यांचीही पार्श्वभूमी निदर्शनास आणून दिली होती.

काँग्रेसच्या चिंतन बैठकीत पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करून सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली. ‘राष्ट्रवादी’कडून नेहमीच भाजपची बाजू घेतले जाते. काँग्रेसचा अपमान करण्याची हा पक्ष एकही संधी सोडत नसल्याचे पटोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात आज नागपूरमध्ये बोलताना आपण सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

‘भांड्याला भांडे लागणारच’

सातारा :‘‘ ‌महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागते. त्याप्रमाणेच याही गोष्टी असतात. मात्र, जनहितासाठी महाविकास आघाडी भक्कम आहे,’’ असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल थेट पक्षाध्यक्ष सोनिया यांच्याकडे तक्रार केली आहे, याबद्दल विचारता अजित पवार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय प्रश्नांपेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आम्हाला त्या राजकीय चर्चांपेक्षा राज्यासमोरील आव्हाने महत्त्वाची वाटतात, असेही ते म्हणाले.

सोनियांना अधिकार

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. मात्र, ज्या उद्देशाने आघाडी स्थापन झाली त्यास ‘राष्ट्रवादी’कडून वारंवार तिलांजली देण्याचे काम होत आहे. अशा परिस्थितीत आघाडी कायम राहणार काय? अशी विचारणा केली असता तो निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना असल्याचे पटोले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप करणाऱ्या काँग्रेसने हिंमत असेल, तर सत्तेतून बाहेर पडावे.

- रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com