युतीपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीचेही 'तुझ्या गळा, माझ्या गळा'

हेमंत पवार 
गुरुवार, 3 मे 2018

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना भाजपत मात्र "तुझ्या गळा, माझ्या गळा'चे नाते जुळले आहे. राज्याच्या राजकारणात आगामी युती व आघाडीचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधला बेबनाव समोर आल्यानंतर आघाडीचेही सुर जुळले आहेत. 

कऱ्हाड : विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढवण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार काँग्रेस पक्ष चंद्रपुर, अमरावती, परभणी आणि कोकण, नाशिक आणि बीड-उस्माबाद-लातुर या तीन जिल्ह्यातील एक अशा तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल तर लोकसभेसाठी पालघरची जागा काँग्रेस पक्ष आणि गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आणि जेष्ठ नेते पी. डी. पाटील समाधीस्थळी आज अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, देवराज पाटील, सौ. शालन माळी, मानसिंगराव जगदाळे, राजेश पाटील-वाठारकर आदि उपस्थित होते.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना भाजपत मात्र "तुझ्या गळा, माझ्या गळा'चे नाते जुळले आहे. राज्याच्या राजकारणात आगामी युती व आघाडीचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधला बेबनाव समोर आल्यानंतर आघाडीचेही सुर जुळले आहेत. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी तीन जागांवर उमेदवार उभे करत कोणत्याही जाहीर घोषणेशिवाय भाजपसोबत युतीचा छुपा समझोता केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्षाचे वातावरण पेटलेले असले तरी, सत्तेच्या व्यासपीठावर मात्र युती धर्माची पाठराखण केली जात असल्याचे मानले जाते. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांतही युती अभेद्य राहण्याची हे चिन्हे असल्याचे जाणकार मानतात. काँग्रेसकडे असलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार उतरवला होता. अखेर याठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. 

Web Title: Congress NCP alliance in legislative council election maharashtra