पराभवाने आघाडी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वत:च्या गडातच पराभवाचा दणका बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने एकहाती लढूनही काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला सर केला. या पराभवाने आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याची चर्चा आहे.

सांगली महापालिकेत गेल्या पंधरा वर्षे काँग्रेस ‘राष्ट्रवादी’ची सत्ता होती. जयंत पाटील व प्रतीक पाटील यांच्यासह इतर मातब्बर नेते आघाडीकडे होते. राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा या नेत्यांनी उमटवला आहे. त्यातच जयंत पाटील यांना ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्षपद दिल्यानतंर सांगली महापालिकेत फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. आजपर्यंतच्या निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावरच परस्परांच्या विरोधात उभी राहत होती. मात्र, या वेळी पहिल्यांदाच आघाडी करून निवडणूक लढवतानाही दोन्ही पक्षाला पराभवाचा दणका बसला. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारालादेखील येण्यापासून रोखण्यात आले होते. अशा स्थितीत भाजपने काँग्रेस - ‘राष्ट्रवादी’कडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले आहे. या पराभवाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यामध्ये मात्र चिंतेचा सूर आहे.

सांगलीत सत्ता व पैसा यांचा वापर प्रभावी ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असतानाही सत्ता राखू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस 

या पराभवाचे आत्मपरीक्षण करूच; पण सत्ता व पैशाचा अमर्याद वापर हे भाजपच्या यशाचे गमक आहे. आजचा विजय धनशक्तीचा आहे.
सचिन सावंत, प्रवक्‍ते, काँग्रेस

Web Title: congress & NCP los jalgaon & sangli election