Vidhan Sabha 2019 : आघाडीचा जाहिरनामा संयुक्तरित्या होणार प्रसिद्ध

Congress, NCP
Congress, NCP

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा जाहिरनामा आज प्रसिद्ध होणार होता. मात्र, काँग्रेसने स्वतंत्र जाहिरनामा जाहिर करण्याऐवजी एकत्रित संयुक्त जाहिरनामा जाहिर करावा, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देत राष्ट्रवादीने आज जाहिरनामा घोषित करण्याचा निर्णय मागे घेतला.

आघाडीने निवडणूकांना सामोरे जाण्याचा निर्णय झालेला असताना संयुक्त जाहिरनाना प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला आहे. 1997 पर्यंत संघाने मुख्यालयावर झेंडा फडकवला नाही. आम्ही स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी करत असताना आंदोलन उभे केले म्हणून भाजप व संघाने झेंडा फडकवण्याची सुरुवात केली. त्यामुळे अमित शहा यांनी काश्मिरबाबत केलेले वक्तव्य साफ खोट असून तिरंग्याचा तिटकारा असणारे आता तिरंग्याचे राजकारण करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

काश्मिरच्या वेगळ्या झेंड्याला विरोध मान्य पण नागालँडच्या स्वतंत्र झेंड्याबाबत भाजपची भूमिका काय? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात भाजपला दाखवण्यासाठी काहीही नाही म्हणून काश्मिरचा प्रश्न प्रचारात आणला आहे. फडणवीस सरकारने पाच वर्षात ज्या कामाचे भूमिपुजन केले ते काम पुर्ण केल्याचा एकतरी प्रकल्प दाखवून द्यावा. आघाडी सरकारने सुरूवात केलेल्या कामाचे श्रेय घेत हे सरकार फिरत आहे. राज्यात कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याची चिड लोकांमधे आहे हे दिसत असल्यानेच भावनिक प्रश्नावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. काश्मिरमधील जागा पर्यटनाच्या नावाखाली अदानी, अंबानीला देण्यात येतील.काश्मिरमधून 370 कलम हटवण्यास आमचा विरोध नाही. आघाडीमधे काँग्रेस व राष्ट्रवादी 125-125 जागांवर निर्णय झालेला आहे. घटक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. शरद पवार यांचे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण आहे, असे मलिक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com