भाजपचा मास्टरस्ट्रोक; चार आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

BJP
BJP

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मास्टरस्ट्रोक मारत विरोधी पक्षातील चार आमदारांना आपल्या पक्षात समावून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चार आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आणि काँग्रेसच्या एक आमदाराचा समावेश आहे. मुधकर पिचड, चित्रा वाघ यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. या चारही आमदारांनी मंगळवारी आपले राजीनामे दिले होते. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैभव पिचड, संदीप नाईक आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी तर काँग्रेस पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर या चार आमदारांनी प्रवेश केला. 

भाजपमध्ये या 'मेगा भरती'च्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या वेळी भाजपमध्ये विरोधी पक्षांतील अनेक नेते, कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. 

राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार वैभव पिचड, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक, सातारा जिल्ह्यातील सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रवेश केला. या कार्यक्रमाला मधुकर पिचड हेही उपस्थित होते.  

भुजबळ, नाईकांच्या वेळी कोणती चौकशी सुरु होती?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्यावर आरोप केला असला तरी मला त्यांना विचारायचे आहे, की भुजबळ, नाईक यांना तुम्ही घेताना चौकशी सुरु होती का, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com