नाणार प्रकल्पावरून शिवसेनेसह विरोधकांकडून गोंधळ

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 12 जुलै 2018

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयावर बसून सकाळी पावणे अकरा वाजता निदर्शने केली. नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, शेतकऱयांना कर्जमाफीचे पैसे द्या, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरू होताच, विखे पाटील यांनी नाणार येथील शेतकऱयांनी विधान भवनावर आणलेल्या मोर्चाचा उल्लेख करीत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. तेथील 17 ग्रामपंचायतीतील ग्रामसभांनी प्रकल्पाचा विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध बेगडी असल्याचा आरोप त्यांनी केला.

नागपूर : राज्य सरकार नाणार प्रकल्प जोपर्यंत रद्द करीत नाही, तोपर्यंत विधानसभेचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेच्या कामकाजाची सुरवात होताच मागणी केली. त्यांनी शिवसेनेच्या बेगडी प्रेमाचा उल्लेख करताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी जोरदार विरोध केला. सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले.

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयावर बसून सकाळी पावणे अकरा वाजता निदर्शने केली. नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, शेतकऱयांना कर्जमाफीचे पैसे द्या, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरू होताच, विखे पाटील यांनी नाणार येथील शेतकऱयांनी विधान भवनावर आणलेल्या मोर्चाचा उल्लेख करीत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. तेथील 17 ग्रामपंचायतीतील ग्रामसभांनी प्रकल्पाचा विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध बेगडी असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाणार मोर्चाबाबत म्हणणे मांडण्यास परवानगी न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हा प्रकार केल्यानंतर विधानसभेचे काल दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते.
प्रभू म्हणाले, की शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा आहे. मोर्चातील नागरीकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. भास्कर जाधव म्हणाले, की न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट व नियोजित ग्रीन रिफायनरी यांच्यातील हवाई अंतर बाराशे मीटर आहे. धोका झाल्यास संपूर्ण कोकण, कोल्हापूर, सांगलीला धोका होईल.

कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गोळा झाले. त्यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणा सुरू केल्या. मात्र, त्या गोंधळातच अध्यक्षांनी सकाळी साडेअकरा वाजता प्रश्‍नोत्तराचे कामकाज सुरू ठेवले.

Web Title: Congress NCP ShivSena agitation on Nanar Project in Nagpur