'काँग्रेस राष्ट्रवादीचे चाळीसच्या वर आमदार निवडून येणार नाहीत'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे फक्त चाळीस आमदार निवडून येतील. चाळीस होणार नाही हे मी लिहून देतो असा छातीठोक दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे फक्त चाळीस आमदार निवडून येतील. चाळीस होणार नाही हे मी लिहून देतो असा छातीठोक दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला. 

पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, की दोन्ही कॉंग्रेसची अवस्ता फार वाईट आहे. त्यांच्याविषयी वाईट आणि आश्‍चर्यही वाटते. आम्हालाही सक्षम विरोधी पक्ष हवा आहे. आज पन्नास आमदार आमच्याकडे येण्यास तयार आहेत. पण, आम्हीला सर्वानाच घेणे शक्‍य नाही. तसेच ज्या आमदार आणि नेत्यांच्या ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे अशा नेत्यांना भाजपमध्ये घेणार नाही. तसे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ईडीची चौकशी कोणाची सुरू आहे ती नावे मी सांगणार नाही असेही ते म्हणाले. 

भाजपच्या किती जागा निवडून येतील यावर मी भाष्य करणार नाही. कारण आम्हाला युती करायची आहे. त्यामुळे मी तोलून मापूनच बोलणार आहे. युतीमध्ये भांडण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress NCPs only fourty candidate win in Assambly Election says Girish mahajan