Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ 'या' पक्षाची पुण्यात बॅनरबाजी

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला.
tukaram mundhe
tukaram mundhe sakal

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुंढे यांनी आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुढील नियुक्तीसाठी त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले.

हेही वाचा : किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

गेल्या वर्षी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली होती. तेथून राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी बदली झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकपदाचा कारभार मुंढे यांनी हाती घेतला होता; मात्र दोन महिन्यातच राज्य सरकारने त्यांचा कार्यभार काढून घेतला. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 19 वेळा बदली करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhesakal

तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून राजकारण चांगलंच तापल आहे. आज युवक काँग्रेस कडून पुण्यातील टिळक चौकात तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस कडून सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. मुंढे हे कुटुंबकल्याण संचालक चे आयुक्त तसेच, राष्ट्रीय आरोग्य अभियान चे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावरुन पदमुक्त करण्यात आलं आहे.

tukaram mundhe
Rickshaw Drivers Strike : रिक्षा संघटना आक्रमक; 'या' दिवसापासून पुन्हा करणार आंदोलन

मुंडे यांच्या आरोग्य विभागाच्या नेमणुकीमागे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड उपाययोजनांच्या नावाखाली राज्यभरात झालेली अनियमितता चव्हाट्यावर आणण्याचा प्लॅन होता. यातून महा विकास आघाडी विरोधात राजकीय वातावरण तापविण्याचा प्लॅन होता. मात्र मुंडे यांच्या बदलीमुळे भाजपच्या प्लॅनला सध्या तरी ब्रेक लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com