काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला आहे- मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पवारांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्यायच उरलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई- काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पवारांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्यायच उरलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. याचा थेट लाभ काँग्रेस पक्षाला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, इटालिअन न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींच नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे. ख्रिश्चन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर ईडी त्याच्याकडे चौकशी करीत आहेत. त्यामध्ये तो माहिती देत आहेत.

तसेच ते म्हणाले की, कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आता उत्तर देतील का? ऑगस्टा घोटाळ्याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे स्पष्ट करताना ते म्हणाले की, एकूण तीन कंपन्यांना कंत्राट त्यापैकी ऑगस्टा वेस्टलँड ही एक कंपनी आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात आलं असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. अनेक भारतीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही यावेळी लाच दिली गेली. इटलीच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून माहिती मिळवली आहे. या सौद्यात जवळपास 52 टक्के कमिशन काँग्रेस नेत्यांना दिले गेले असल्याची माहितीही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Web Title: Congress Should Clarify about Agustawestland Scam