हवाहवाई सरकार हवेत उडून जाईल - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार असून या सरकारला जमिनीवरच्या कटू वास्तवाची जाणीव नाही. आगामी निवडणुकांत हे हवाहवाई सरकार हवेत उडून जाईल, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुंबई - राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार असून या सरकारला जमिनीवरच्या कटू वास्तवाची जाणीव नाही. आगामी निवडणुकांत हे हवाहवाई सरकार हवेत उडून जाईल, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हवाई प्रवासाकरिता प्रतिवर्षी सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च झाल्याचे माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड खालावलेली आहे, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. कर्जमाफीची प्रक्रिया एके ठिकाणी थांबवली जाते. बोंडअळी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही मिळत नाही. तुरीच्या खरेदीसाठी कर्ज काढावे लागते. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर लावलेला दुष्काळाचा अधिभार दुष्काळ संपून दोन वर्षे झाली तरी वसूल करणे सुरूच आहे. हायवेवरील दारूची दुकाने बंद झाल्यामुळे इंधनावर लावलेला अधिभार दुकाने पुन्हा सुरू झाली तरी वसूल केला जात आहे. सातवा वेतन आयोग अद्याप जाहीर केला जात नाही, अशी परिस्थिती असतानाही स्वतः मुख्यमंत्र्यांकडून अशी उधळपट्टी होत असेल तर ते दुर्दैवाचे आहे. या अगोदरही मंत्रालयातल्या चहापानावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार संवेदनशील नसून बेजबाबदार असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. 

Web Title: Congress spokesman Sachin Sawant criticized