काँग्रेसलाही सावरकरांचा आदर; पण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

30 ऑगस्ट 1911 पर्यंतच्या सावरकरांबाबत आम्हाला आदर आहे. त्यानंतर सावरकर यांच्या विचारात बदल होत गेले ते आम्हाला मान्य नसल्याचे आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, एक प्रकारे 1911 पूर्वीचे सावरकर काँग्रेसला मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

मुंबई : 30 ऑगस्ट 1911 पर्यंतच्या सावरकरांबाबत आम्हाला आदर आहे. त्यानंतर सावरकर यांच्या विचारात बदल होत गेले ते आम्हाला मान्य नसल्याचे आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, एक प्रकारे 1911 पूर्वीचे सावरकर काँग्रेसला मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सचिन सावंत म्हणाले, 'भाजप सावरकरांचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना सावरकर यांच्याबाबत किती माहिती आहे हे मला माहित नाही'. तसेच, भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट लावण्याचे काम केले असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 5 वर्षात भाजपचे अनेक घोटाळे आम्ही समोर आणले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नेहमी क्लीन चिट देण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील भडक्याच्या औरंगाबादेत ठिणग्या 

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे ही काँग्रेस सरकारची इच्छा होती. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक उभारणीत भ्रष्ट्राचार झाला आहे. महाराजांच्या स्मारकात घोटाळा करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. टेंडर निघाल्यानंतर वाटाघाटी करत पैसे कमी केले गेले. शिवस्मारकाचे स्पेसिफिकेशन कमी करण्यात आले असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

दिपीकाचा नवा हॉलिवूड सिनेमा? 

अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी केली होती. चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया झाल्याचे विभागीय लेखापालांनी सांगितले होते. शासकीय सल्ला घेण्यासाठी विधी अधिकाऱ्यांची मदत न घेता खासगी कंपनीने नेमलेल्या विधी समितीचा सल्ला घेतला गेला. मुकुल रोहतगी यांनी शासनाला सल्ला दिला आणि तेच कोर्टातून स्टे उठवण्यासाठी कंपनीची बाजू मांडत होते, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Spokesperson Sachin Sawant press conference in Mumbai About Sawarkar