अनंत गिते काय चुकीचं बोलले? नाना पटोलेंनी केलं समर्थन

"शिवसेना आणि काँग्रेस विपरित परिस्थितीत एकत्र आले हे सत्य आहे"
nana patole
nana patolenana patole

मुंबई: माजी खासदार आणि शिवेसना नेते अनंत गिते (anant geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन नवीन राजकीय वाद (political row) निर्माण झाला आहे. "राष्ट्रवादीचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत" असं विधान अनंत गिते यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनंत गिते यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. "अनंत गिते काही चुकीचं बोललेले नाहीत. शिवसेना-काँग्रेस अशी आघाडी कधीच होऊ शकत नव्हती. शिवसेना आणि काँग्रेस विपरित परिस्थितीत एकत्र आले आहेत. हे सत्य आहे" असे नाना पटोले म्हणाले.

nana patole
ठाणे: मांत्रिकाने जंगलात मुलीवर केला बलात्कार, आईने दिली साथ

"भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. नैसर्गिक युती आहे, हे आमचे नेते कधीच बोलले नाहीत. आम्ही अनंत गीते यांच्या सगळ्याच मतांशी सहमत नाही" असे पटोले म्हणाले. महाविकास आघाडी सरकार एका कमिटमेंटने एकत्र आले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

nana patole
राष्ट्रवादीची विखारी टीका, पण अनंत गितेंना भाजपाने दिली साथ

अनंत गिते नेमकं काय म्हणाले...

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे" असे वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री (Anant Geete) अनंत गिते यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com