केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचा राज्यभर "एल्गार' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, त्यामुळे राज्यातील सर्व शहर, तालुका व जिल्ह्यात शासनाच्या विरोधात कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलने करण्याचे फर्मान प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. त्यानुसार उद्या (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. 

सोलापूर : केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, त्यामुळे राज्यातील सर्व शहर, तालुका व जिल्ह्यात शासनाच्या विरोधात कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलने करण्याचे फर्मान प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. त्यानुसार उद्या (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. 

बेरोजगारी, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, महागाई, उद्धवस्त झालेली बॅंकींग व्यवस्था, संकटात सापडलेली शेती या प्रमुख मुद्‌द्‌यांसह स्थानिक प्रश्‍नांचा समावेश आंदोलनाच्या वेळी करण्यात यावा. या संदर्भातील निवेदन प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशा सूचनाही प्रदेश कॉंग्रेस समितीने दिलेल्या आदेशात करण्यात आल्या आहेत. 

या आंदोलनात कॉंग्रेसचे आजी-माजी खासदार, आमदार, कॉंग्रेसचे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष, सर्व विभाग व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहभागी करून घेऊन आंदोलन करावे, असेही प्रदेश सरचिटणीस रामकिसन ओझा यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Congress will come up strike against the central government