राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार 

राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार 

मुंबई - राजस्थानमधून भाजपची सत्ता जाईल आणि तेथे कॉंग्रेस एकहाती विजय मिळवेल. तसेच मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगली टक्कर होईल; मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा अंदाज सट्टेबाजारात व्यक्त केला जात आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता सहज मिळेल, तर तेलंगणमध्ये त्रिशंकू विधानसभा राहणार असल्याने घोडेबाजाराला ऊत येईल असा अंदाजही असून, या चार निवडणुकांसाठी तब्बल 28 हजार कोटींचा सट्टा लागला आहे. 

या राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आगामी लोकसभा निवडणुकीची  वाटचाल ठरवणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आले आहे. मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाच मतदारांनी पसंती दिली आहे; मात्र कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अपेक्षित उमेदवार कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही थेट नाकारलेले नाही. त्यामुळे ही निवडणूकही गुजरातप्रमाणे चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. राज्यस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना मतदारांनी सपशेल नाकारले असून, भाजप राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या आसपासही पोचू शकत नाही, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. 

स्थानिक परिस्थिती, राजकीय जाणकारांकडून माहिती घेऊन सट्टेबाज त्यांचे भाव ठरवतात. त्यामुळे विजयाची शक्‍यता सर्वाधिक असणाऱ्या व्यक्ती किंवा पक्षाला कमी भाव देण्यात येतो. त्याउलट पराभवाची शक्‍यता अधिक असणाऱ्याला अधिक भाव देण्यात येतो. बदलत्या राजकीय समीकरणांनुसार सट्ट्यांचे भावही बदलत असतात. 

राजस्थानसाठी सट्ट्याचा भाव 
कॉंग्रेस/भाजप 
जागा - भाव (रुपयांत)/जागा - भाव 
110 - 45 पैसे / 60 - 35 पैसे 
115 - 72 पैसे / 65 - 55 पैसे 
120 - 1 रुपया / 70 - 1 रुपया 
125 - 1.80 रुपये / 75 - 1.35 रुपये 

मुख्यमंत्री 
कॉंग्रेस - अशोक गेहलोत-80 पैसे 
सचिन पायलट-1.35 रुपये 
वसुंधराराजे-11 रुपये 

मध्य प्रदेश सट्टा भाव 
कॉंग्रेस भाजप 
जागा-भाव जागा-भाव 
100- 47 पैसे 100 - 32 पैसे 
105 - 90 पैसे 105 - 65 पैसे 
110- 1.60 रुपये 110- 1.05 रुपया 
115 - 2.40 रुपये 115- 1.80 रुपये 
120- 3.50 रुपये 120 2.25 रुपये 

मुख्यमंत्री 
शिवराजसिंह चौहान - 1 रुपया 
कमलनाथ - 1.65 रुपये 
ज्योतिरादित्य शिंदे - 2 रुपये 

छत्तीसगड सट्टा भाव 
भाजप कॉंग्रेस 
जागा-भाव जागा-भाव 
35-22 पैसे 35-45 पैसे 
40- 42 पैसे 40-90 पैसे 
45-1 रुपया 45-2 रुपये 
50-2.50 रुपये 50-5 रुपये 

मुख्यमंत्री 
रमण सिंह - 60 पैसे 
इतर -3 रुपये 

भारत-ऑस्ट्रेलिया  सामन्यावर सट्टा 
पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलिया हा क्रिकेटमधील भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यांवर दणकून सट्टा लागतो; मात्र, या वेळी विधानसभा निवडणुकांमुळे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर अवघा एक हजार कोटींचा सट्टा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com