'मनसे', 'एमआयएम'ला आमचा विरोध : अशोक चव्हाण 

'मनसे', 'एमआयएम'ला आमचा विरोध : अशोक चव्हाण 

पुणे : भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भारीप-बहुजन महासंघाशी चर्चा सुरू आहे. मात्र, "मनसे' आणि "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लमिनला (एमआयएम) आघाडीसोबत घेणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण पुण्यात आले होते. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे, कॉंग्रेसची भूमिका आणि आगामी निवडणुकांबाबत पक्षाची व्यूहरचना मांडली. 
चव्हाण म्हणाले, ""निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि मनसे हे एकत्र येण्याची चर्चा आहे; परंतु आम्हाला मनसे नकोच आहे. मात्र, राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याशिवाय भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही माझी चर्चा झाली असून, ते सध्या एमआयएमसोबत आहेत. आंबेडकर कॉंग्रेससोबत आले तर आनंदच होईल.'' 

निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडील इच्छुकांची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, पुढील निवडणुकीत जनता या सरकारला सत्तेतून बाहेर काढणार आहे. त्यामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला. 

काकडेंचा प्रश्‍नच नाही 
खासदार संजय काकडे कॉंग्रेसचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, कॉंग्रेसचे अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे या इच्छुकांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना तिकीट देणार का, या विषयावर बोलण्यास चव्हाण यांनी टाळले. दरम्यान, पक्षातील नाराज हायकमांडकडे दाद मागू शकतात, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com