रायगडच्या संवर्धनासाठी सामंजस्य करार - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - ऐतिहासिक रायगड किल्ला संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांची नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या सोबत बैठक झाली. बैठकीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, बैठकीत प्रामुख्याने रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. राज्याने या कामासाठी 606 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

मुंबई - ऐतिहासिक रायगड किल्ला संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांची नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या सोबत बैठक झाली. बैठकीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, बैठकीत प्रामुख्याने रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. राज्याने या कामासाठी 606 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. या कामाला गती येण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर राज्य सरकारच्या सेवेत द्यावे, अशी विनंती करण्यात आली. त्याला मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र शासन व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजी राजे छत्रपती, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक उषा शर्मा, मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते. 

बैठकीतील निर्णय... 
- बळिराजा चेतना अभियानासाठी निधी देणार 
- झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे 
- झुडपी जंगलाची 54 हजार हेक्‍टर जमीन विविध प्रकल्पांसाठी देणार 

Web Title: conservation of Raigad - Chief Minister