20 लाखांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला पकडले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जुलै 2018

बारामती पोलिस कर्मचाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. संबंधित पोलिस कर्मचारी बारामती पोलिस ठाण्यात कार्यरत असून, एका जमीन प्रकरणाचा तपास त्याच्याकडे होता. त्यातच त्याने ही लाचेची मागणी केली. 

पुणे : बारामती पोलिस कर्मचाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. संबंधित पोलिस कर्मचारी बारामती पोलिस ठाण्यात कार्यरत असून, एका जमीन प्रकरणाचा तपास त्याच्याकडे होता. त्यातच त्याने ही लाचेची मागणी केली. 

दादासाहेब महादेव ठोंबरे (47) असे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याला 'एसीबी'ने अटक केली. त्याच्यावर लाच घेणे आरोप ठेवण्यात आले आहे. याबाबत एसीबीने सांगितले, की तक्रारदार हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीप्रकरणाचा तपास ठोंबरे याच्याकडे होता. मात्र, ठोंबरेने तक्रारदाराला याप्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन देत 20 लाखांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने ही कारवाई केली.

Web Title: Constable held for taking Rs 20000 bribe in Pune rural area