संविधानच देशाला सर्वोच्च शक्ती बनवेल - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान यांच्यामुळेच देश सर्वोच्च शक्ती बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपले सरकार समाजातील शेवटच्या घटकातील माणसापर्यंत प्रकाश पोचवण्याचे काम करीत आहे, असे ते म्हणाले. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ६) चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायांची गर्दी उसळली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार सुप्रिया सुळे आदींनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. 

Web Title: Constitution will make the country the supreme power says CM