घटनातज्ज्ञ म्हणतात, '...यामुळे राष्ट्रपती राजवटीची शक्‍यता बळावली'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा नाकारला, तर मात्र राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळावली आहे.

मुंबई : सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप सरकार स्थापन करण्यासाठी राजी नसल्यानंतर राज्यपालांनी त्यानंतर दुसरा क्रमांक असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असणारे पुरेसे संख्याबळ सिद्ध करण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला होता.

या अवधित शिवसेना हा पक्ष पुरेशा आमदारांचे समर्थन असल्याचे सिद्ध करू शकला नाही. यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळकट झाली असल्याचे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ सुभाष कष्यप यांनी मांडले आहे.

- संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण?

कष्यम यांच्या मताप्रमाणे, शिवसेनेनंतर तिस-या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपाल बोलावू शकते. यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. यामध्ये 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे.

- महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या...

तर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी वेगळे मत मांडले आहे. सरोदे यांच्या मते संविधानातील कलम 172 अन्वये राज्यपालांना वेळेची मर्यादा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा नाकारला, तर मात्र राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळावली आहे. 

- माजी पंतप्रधान म्हणाले, 'बाळासाहेबांनीच महाराष्ट्रात भाजपचे बस्तान बसवले!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constitutionalist Dr Subhash Kashyap said that possibility of presidential rule was strengthened in Maharashtra