एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे आयटीआयमध्ये रूपांतर! 

तुषार खरात
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - राज्यात अकरावी व बारावी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या "किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमां'चे (एमसीव्हीसी) आयटीआयमध्ये रूपांतर करण्याचा तत्त्वत: निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या "कौशल्य विकासा'च्या धोरणाशी सुसंगत नाही. विद्यार्थ्यांचे त्यातून मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. 

कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी याबाबत गेल्या आठवड्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. शिक्षकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुन्हा आज (ता. 9) एका बैठकीचे आयोजन केले होते. 

एमसीव्हीसी अभ्यासक्रमांमध्ये तंत्र, वाणिज्य, पॅरा मेडिकल, मत्स्य, कृषी, होम सायन्सेस असे एकूण सहा गट आहेत. आयटीआयमध्ये मात्र "तंत्र' हा एकमेव गट आहे. शिवाय एमसीव्हीसी हा अभ्यासक्रम अकरावी व बारावी या स्तरावर शिकविला जातो. बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बीएस्सीसाठी (व्यवसाय शिक्षण) प्रवेश मिळतो. केंद्र सरकारच्या नवीन धोरणांनुसार आता शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन व पदवी स्तरावर कौशल्य शिक्षणाचे अभ्यासक्रम तयार होऊ लागले आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या संस्थेनेही बीएस्सी (व्होकेशनल) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. 

वाढीव निधीचे कारण 
राज्यात सध्या आयटीआय अभ्यासक्रमाची सव्वालाख प्रवेश क्षमता आहे. ही प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभागाकडून सुरू आहे. पण नवीन आयटीआय सुरू करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तसेच वाढीव निधीची गरज भासणार आहे. इतका निधी उपलब्ध करणे शक्‍य नाही, त्यामुळे एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे रूपांतर आयटीआयमध्ये करण्याचा निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला असल्याचा आरोप "महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघा'चे महासचिव विद्याधर गोडबोले यांनी "सकाळ"शी बोलताना केला. 

या अभ्यासक्रमासाठी एससीव्हीसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, पण आयटीआयच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही. 
एमसीव्हीसी अभ्यासक्रमाला आणखी प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे आयटीआयमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय अशैक्षणिक असल्याने त्याला राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. 
- विद्याधर गोडबोले, महासचिव, कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघ.

Web Title: Convergence of MCVC courses in ITI