Jalna News: मोठी बातमी! जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

Jalna News: मोठी बातमी! जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर

गेल्या अनेक वर्षांपासून जालना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करावी अशी मागणी काही पक्षाकडून केली जात होती. दरम्यान, जालनाकरांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर करण्यात आलं आहे. (Conversion of Jalna Municipality into Municipal Corporation Cm Eknath Shinde )

एबीपीच्या वृत्तानुसार, नगर विकास उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु होती. दोन तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राज्यात शिंदे सरकार येताच राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन यांनी जालना पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी वर्षभरापूर्वी पाठपुरावा केला होता. (Latest Marathi News)