दोन हजार जणांचे धर्मांतर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

रिझवान, अर्शिदचे कारस्थान; घरातून कागदपत्रे जप्त
मुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि केरळ पोलिसांनी अटक केलेले "इसिस‘चे संशयित दहशतवादी रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या दोघांनी देशभरात दोन हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर घडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

रिझवान, अर्शिदचे कारस्थान; घरातून कागदपत्रे जप्त
मुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि केरळ पोलिसांनी अटक केलेले "इसिस‘चे संशयित दहशतवादी रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या दोघांनी देशभरात दोन हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर घडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या दोघांच्या घरांतून तपासयंत्रणांना याबाबतची कागदपत्रे मिळाली आहेत. त्याची पडताळणी सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही अशा प्रकारचे धर्मांतर झाले आहे. त्यासंबंधी बॉंड, निकाह प्रमाणपत्रे तयार करण्याकरता अनेक वेळा आझाद मैदान येथील किल्ला कोर्टबाहेरच्या वकिलांची मदत घेतल्याचेही उघड झाले आहे.

डॉ. झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी (आयआरएफ) संबंधित असलेला अर्शिद आणि कल्याण येथून अटक केलेल्या रिझवानने केरळमधील युवकांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांनी राज्यातही अशा प्रकारच्या धर्मांतराचा धडाकाच लावला होता, हेही उघडकीस आले आहे. या धर्मांतरासाठी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थपुरवठा करत असल्याचा तपासयंत्रणांना संशय आहे. अर्शिद आणि रिझवानच्या कारवायांची चौकशी करणाऱ्या एटीएसच्या हाती लागलेल्या माहितीने तपासयंत्रणांची झोप उडवली आहे.

"त्यात‘ही रिझवानचा हात?
कल्याणच्या ज्या बाजारपेठ परिसरातून रिझवानला अटक झाली, त्याच परिसरातील चौघे तरुण "इसिस‘मध्ये भरती होण्यासाठी निघून गेले होते. त्यापैकी अरीब माजिद पुन्हा भारतात परतला. उर्वरित तिघांपैकी एकाचा सीरियातील युद्धात बळी गेला. या तरुणांसोबत असलेल्या रिझवानच्या संबंधांची एटीएस आणि अन्य यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. या मुलांची माथी भडकवण्यात रिझवानचा हात आहे का, हेही तपासले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Conversion of two thousand