ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याबाबत सहकारमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

साखरेच्या निर्यातीमुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे कारखान्यांना साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल.​

पुणे : "यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, तर मराठवाड्यात दुष्काळामुळे ऊसाची टंचाई आहे. यामुळे अनेक कारखाने कमी क्षमतेने सुरू आहेत. याही परिस्थितीत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत. मात्र, एफआरपी देताना कारखान्यांना कोणतीही सवलत देण्याची राज्य सरकारची भूमिका नाही,'' असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकार व पणन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी साखर संकुल येथे गुरुवारी (ता.16) आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- अजित पवारांचा असा अपमान पाहिला नाही : तावडे

पाटील म्हणाले, "ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उसाला चांगला दर मिळण्याची मागणी असते. प्रत्येक साखर कारखाना उद्योग नफ्यात आणण्यासाठी आणि उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, इतर उद्योगांप्रमाणे साखर उद्योगाचे नाही. या उद्योगाला एक चक्र असून, दरवर्षी विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असते. त्याला सामोरे जात उद्योग सक्षम करण्यासह दूरगामी उपाययोजनांसाठी प्रयत्न करण्यात येतील. साखरेच्या निर्यातीमुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे कारखान्यांना साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल.'

- PIFF : मराठीत 'आनंदी गोपाळ', तर ट्युनिशियाचा 'अ सन' सर्वोत्कृष्ट!

यापूर्वी आपण साखर कारखाना संघामध्ये काम केले आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून असून, ते सामंज्यस्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

- पीएमपीच्या नव्या अध्यक्षांकडे आहेत चार, मोठ्या पदव्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cooperative ministers Balasaheb Patil announced important decision of FRP for sugar factories