esakal | कोरोनाबाधित शिक्षकांना महिन्याची सुट्टी ! बावीसशे शिक्षक पॉझिटिव्ह; पाच जिल्ह्यांमधील शाळा बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

303School_20fb_20_20Copy_2.jpg

कोरोनाबाधित शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक नाही
शिक्षकांच्या कोरोना चाचणीत आतापर्यंत दोन हजारांहून अधिक शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, म्हणून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना ड्युटीवर येणे बंधनकारक नसून, शासन स्तरावरुन स्वतंत्र आदेश काढले जातील.
-विशाल सोळंकी, आयुक्‍त, शिक्षण, मुंबई

कोरोनाबाधित शिक्षकांना महिन्याची सुट्टी ! बावीसशे शिक्षक पॉझिटिव्ह; पाच जिल्ह्यांमधील शाळा बंदच

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु झाले असून, दीड लाख शिक्षकांमध्ये दोन हजार 212 शिक्षक, तर 56 हजार 34 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये 682 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखी 76 हजार शिक्षकांची आणि 36 हजार कर्मचाऱ्यांची टेस्ट झालेली नाही. कोरोनामुळे जळगाव, ठाणे, धुळे, नाशिक व मुंबईमधील एकही शाळा सुरु झालेली नाही. बाधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 14 दिवस नव्हे, तर किमान एक महिन्याची सुट्टी दिली जाणार आहे.

कोरोनाबाधित शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक नाही
शिक्षकांच्या कोरोना चाचणीत आतापर्यंत दोन हजारांहून अधिक शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, म्हणून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना ड्युटीवर येणे बंधनकारक नसून, शासन स्तरावरुन स्वतंत्र आदेश काढले जातील.
-विशाल सोळंकी, आयुक्‍त, शिक्षण, मुंबई


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शिक्षणाच्या प्रवाहातून ते बाहेर जाऊ नयेत, म्हणून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 22 हजार 204 पैकी 11 हजार 322 शाळा सुरु झाल्या असून, 56 लाख 48 हजार विद्यार्थ्यांपैकी चार लाख 91 हजार 962 विद्यार्थी शाळेत येत आहेत. तत्पूर्वी, लॉकडाउन काळात घरातूनच ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविताना कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानुसार राज्यातील एक लाख 51 हजार 539 शिक्षकांची, तर 56 हजार 34 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पार पडली. त्यात सोलापूर, यवतमाळ, बुलडाणा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील सर्वाधिक शिक्षक, तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना बाधित शिक्षक, कंसात कर्मचारी
अमरावती 47 (7), गडचिरोली 80 (46), उस्मानाबाद 69 (14), सातारा 80 (34), सोलापूर 247 (14), अकोला 40 (21), यवतमाळ 120 (57), लातूर 87 (25), जालना 69 (23), औरंगाबाद 92 (37), नंदुरबार 26 (4), बुलडाणा 119 (4), गोंदिया 180 (13), चंद्रपूर 265 (115), भंडारा 97 (36), रत्नागिरी 9 (3), सांगली 20 (15), रायगड 83 (43), सिंधुदूर्ग 21 (9), वाशिम 49 (8), बीड 58 (9), कोल्हापूर 38 (20), नगर 40 (33), पुणे 92 (20), वर्धा 30 (37), जळगाव 31 (14), धुळे 15 (5), नांदेड 86 (12), नागपूर 35 (3), नाशिक 21, परभणी 27, मुंबई 21 (10) व हिंगोली 65 (13).

loading image