coronavirus : कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण 94.37 टक्‍क्‍यांवर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ हजार 174 आहे. कोरोनामुळे आठ हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.80 टक्के आहे. 

पुणे - विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण पाच लाख 19 हजार 374 झाली आहे. त्यापैकी चार लाख 90 हजार 122 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात 14 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजार 7 इतकी आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.37 टक्के इतके आहे. \

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीन लाख 32 हजार 145 इतका झाला आहे. त्यापैकी तीन लाख 14 हजार 867 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ हजार 174 आहे. कोरोनामुळे आठ हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.80 टक्के आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उर्वरित चार जिल्ह्यांमधील स्थिती (18 नोव्हेंबरअखेर) : 
सातारा जिल्हा : 

बाधितांची संख्या : 48 हजार 957 
बरे झालेले : 44 हजार 974 
उपचार सुरू असलेले : 2 हजार 337 
मृत्यू : 1 हजार 646 

सोलापूर जिल्हा : 
बाधितांची संख्या : 43 हजार 335 
बरे झालेले : 39 हजार 657 
उपचार सुरू असलेले : 2 हजार 129 
मृत्यू : 1 हजार 549 

सांगली जिल्हा : 
बाधितांची संख्या : 46 हजार 164 
बरे झालेले : 44 हजार 113 
उपचार सुरू असलेले : 369 
मृत्यू : 1 हजार 682 

कोल्हापूर जिल्हा : 
बाधितांची संख्या : 48 हजार 773 
बरे झालेले : 46 हजार 511 
उपचार सुरू असलेले : 594 
मृत्यू : 1 हजार 668 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona discharge rate is 94.37 percent