कोरोनामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट; तर सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

कोरोनाच्या फटक्‍यामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आता नोकरीतील सुरक्षितता हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा तरुणांमध्ये सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ झाली आहे.

मुंबई - कोरोनाच्या फटक्‍यामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आता नोकरीतील सुरक्षितता हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा तरुणांमध्ये सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेली काही वर्षे खासगी नोकऱ्यांच्या मोठ्या संधी व चांगले वेतन यामुळे या क्षेत्राला चांगले दिवस होते. इतके दिवस लहान शहरांमधील तरुण चांगल्या खासगी नोकऱ्यांसाठी महानगरांमध्ये जात होते; मात्र आता हा प्रवाह उलटा झाल्याने महानगरांपेक्षा लहान शहरांमध्येच सरकारी नोकरीचे आकर्षण तरुणांमध्ये वाढत आहे. ‘अड्डा २४७’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामधून ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या फैलावात सरकारी नोकऱ्यांची स्थिती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. 

खासगी क्षेत्रात कधीही नोकरी जाण्याची भीती व सरकारी नोकरीतील सुरक्षितता यामुळे तरुण पुन्हा सरकारी नोकरीकडे वळू लागले.
- अनिल नागर, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, अड्डा २४७

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect on private job and government job demand increase