Coronavirus Updates : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढतंय, तिघांचा मृत्यू; 24 तासांत आढळले 'एवढे' रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus in maharshtra

Coronavirus Updates : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढतंय, तिघांचा मृत्यू; 24 तासांत आढळले 'एवढे' रुग्ण

मुंबईः मागच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होतेय. विशेष म्हणजे मुंबईमध्ये कोरोना रुग्ण गतीने वाढत आहेत.

सध्या राज्यामध्ये २ हजार ३४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. डिसेंबर २०२२ पासूनच मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरु आहे.

मागच्या २४ तासांमध्ये राज्यामध्ये ४५० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाच्या आकड्यांत झपाड्याने वाढ होतेय. त्यामुळेच मुंबईतल्या अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु करण्यात आलेले आहेत. कोरोना वॉर्डांमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टसह इतर सुविधा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोना गतीने वाढत आहे. राज्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त असून आकड्यांनुसार ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा सक्रीय रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

मुंबईमध्ये बीएमसीने बेडच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. बीएमसीच्या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये १ हजार ८५० बेड वाढवण्यात आलेले आहेत. तर कस्तुरबा रुग्णालयातही बेड वाढवण्यात आले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने बेड वाढवण्यचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :CoronavirusCovid