चोरट्याचे धाडस ! कोरोना पॉझिटिव्ह आशा वर्करच्या घरातून लांबविले पावणेदोन लाखांचे दागिने 

तात्या लांडगे
Monday, 29 June 2020

पॉझिटिव्ह आशा वर्करमुळे घरातील सर्वजण क्‍वारंटाईन 
महापालिकेत आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील घरातील सर्वांची 23 जूनला विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने डाव साधला. घराचे कुलूप तोडून तब्बल 66 ग्रॅम सोने आणि 65 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोलापुरजवळील शिवाजी नगर, बाळे येथील तुळशीदास हौसिंग सोसायटीत 26 ते 27 जूनच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार चावडीचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. देशमाने हे करीत आहेत. 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात घरोघरी सर्व्हे करताना महापालिकेतील एक आशा वर्कर कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर त्यांच्या थेट संपर्कात असलेल्या घरातील सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने कुलूप तोडून त्यांच्या घरातील 66 ग्रॅम सोने आणि 65 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना 26 ते 27 जून या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सुनिल मुरलिधर सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

लॉकडाउन शिथिल होताच वाढल्या चोरीच्या घटना 
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर शहरात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, काही चोरट्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यातही घेतले आहे. तरीही चोरीच्या घटना सुरुच आहेत. शिवाजी नगर परिसरातील बाळे येथील तुळशीदास हौसिंग सोसायटीत झालेल्या चोरीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. पोलिस त्या परिसरातील सीसीटिव्हीचा शोध घेत आहेत. 

पॉझिटिव्ह आशा वर्करमुळे घरातील सर्वजण क्‍वारंटाईन 
महापालिकेत आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील घरातील सर्वांची 23 जूनला विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने डाव साधला. घराचे कुलूप तोडून तब्बल 66 ग्रॅम सोने आणि 65 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोलापुरजवळील शिवाजी नगर, बाळे येथील तुळशीदास हौसिंग सोसायटीत 26 ते 27 जूनच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार चावडीचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. देशमाने हे करीत आहेत. 

बेशिस्त वाहनचालकांची वर्दळ सुरुच 
सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना या विषाणूची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून ठोस नियोजन केले जात आहे. दुसरीकडे मात्र, रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली दिसत नाही. विनापरवाना अथवा नियमांचे उल्लंघन करुन सोलापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करीत शहर हद्दीतून परराज्यात तथा परजिल्ह्यात जाणारी वाहनेही वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी रविवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नाकाबंदी दरम्यान, 284 वाहनांवर कारवाई केली आहे. तर 256 व्यक्‍तींना क्‍वारंटाईन करीत काहींना वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Asha Workers jewelery stolen from his house