esakal | Corona Update: राज्यात पुन्हा वाढले कोरोना मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यात पुन्हा वाढले कोरोना मृत्यू

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : सोमवारी नियंत्रणात आलेला मृत्यूचा आकडा आज पुन्हा वाढला. राज्यात आज 196 रुग्ण दगावले. त्यांपैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 29 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा 1,26,220 वर पोहोचला आहे. आज औरंगाबाद 42,अकोला 2,ठाणे 31,नाशिक 9, पुणे 47, कोल्हापूर 61, लातूर मंडळात 4 मृत्यू नोंदवला गेला.तर नागपूर मंडळात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूचा दर 2.04 % इतका झाला आहे. आज दिवसभरात 10,978 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59,38,734 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.21 % एवढे झाले आहे.

हेही वाचा: ऑगस्टमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार; आरोग्य मंत्र्यालयाची ग्वाही

राज्यात आज दिवसभरात 7,243 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,72,645 झाली आहे.राज्यात आज रोजी एकूण 1,04,406 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,43,83,113 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,72,645 (13.91 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,74,463 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,607 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image