esakal | Corona Update : राज्यात दिवसभरात 3,898 नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona_

Corona Update : राज्यात दिवसभरात 3,898 नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात 3,898 नव्या रुग्णांची भर पडली. मृत्यूचा आकडा ही वाढला असून आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांची एकूण संख्या 1,37,897 इतका झाला आहे.

नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5, नाशिक 21, पुणे 40, कोल्हापूर 15, औरंगाबाद 1, लातूर 2, अकोला 2 मृत्यू नोंदवले गेले. आज दिवसभरात 3898 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,93,698 झाली आहे.

हेही वाचा: नागपुरात चर्चेनंतरच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असून 47,926 इतकी झाली. आज 3,581 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,04,336 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.08 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: कोरोनाचा नियम मोडला अन् 5 वर्ष तुरुंगात झाला 'क्वारंटाईन'

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,51,59,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,93,698 (11.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,06,524 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर 2,021 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

loading image
go to top