Corona Update : राज्यात दिवसभरात ६,६९५ नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.६६ टक्क्यांवर
Maharashtra Corona
Maharashtra Corona Sakal Media

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,695 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,36,220 झाली आहे. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 74,995 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आज दिवसभरात 7,120 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,24,278 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के एवढं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

तसेच राज्यात आज 120 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नागपूर आणि अकोला मंडळात एक ही मृत्यू झाला नाही.  पुणे आणि कोल्हापूर मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे आज अनुक्रमे 39 आणि 37 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 21, नाशिक 14, औरंगाबाद 1, लातूर 8 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,33,530 वर पोहोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com